बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकरी आंदोलनाच्या तोडग्यासाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी संघटनांचं मोठं पाऊल

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सात महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकारने यावर काही तोडगा काढलेला नाही. सुरुवातीला अतिशय शांतपणे चाललेलं शेतकरी आंदोलन आता हळूहळू हिंस्त्र रुप घेऊ लागलं आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या मनात नवीन कृषी कायद्यांविरोधात संताप वाढताना दिसत आहे.

अशातच 19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनावेळी केंद्र सरकारला घेरण्याची आंदोलनातील शेतकऱ्यांनी संपूर्ण तयारी केली आहे. आंदोलनातील शेतकरी नेते 17  जुलैपर्यंत संसदेत शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांना पत्र पाठवणार आहेत.

तसेच पावसाळी अधिवेशनावेळी प्रत्येक शेतकरी संघटनेचे 5 सदस्य असे तब्बल 200 शेतकरी सदस्य रोज संसदेबाहेर आंदोलन करतील. आंदोलनातील नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच पावसाळी अधिवेशनावेळी शेतकरी संसदेबाहेर आंदोलन करतील, असे संकेत दिले होते.

दरम्यान, केंद्र सरकारने नव्यानं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पहायला मिळत आहेत. जोपर्यंत केंद्र सरकार हे कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचं आंदोलनातील शेतकऱ्यांचं म्हणनं आहे. नव्या कृषी विधेयकांमुळे देशातील वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. यामुळे मोदी सरकार या कृषी कायद्यांबद्दल काय तोडगा काढणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांंदीचे भाव उतरले; वाचा ताजे दर

“नितेश राणेंकडे असलेली प्रगल्भता दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही”

धक्कादायक! लसीकरण करण्यासाठी नेलं अन् नसबंदी करुन आणलं

नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांनंतर आता शिवसेना नेतेही भडकले, म्हणाले…

विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा न्यायालयाच्या कक्षेत

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More