बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी, देवेंद्र फडणवीसांच्या काळात…”

पुणे | माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. यावेळी बोलताना नरेंद्र पाटील यांनी ठाकरे सरकार मराठा आरक्षणाचा विषय विसरून गेल्यासारखं आहे, असं म्हटलं आहे. तसेच मराठा समाजाची कामे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाली, असं वक्तव्य नरेंद्र पाटलांनी केलं आहे.

यावेळी बोलताना नरेंद्र पाटील यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ‘महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षात  मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले. या सरकारने मराठा समाजाची माफी मागावी, असं नरेंद्र पाटीलांनी म्हटलं आहे. तसेच मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोसं काम केलं पाहिजे, असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकारने केलेल्या गंभीर चुकांमुळे आणि सरकारच्या बेफिकीरपणामुळे  मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले, असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी राज्य सरकार टीकास्त्र सोडले आहे. या सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि नंतर ते रद्द केले, अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाकरे सरकारने कोणतेही गंभीर प्रयत्न केले नाहीत, अशी टीका करत नरेंद्र पाटील यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. यावेळी बोलताना नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा युती सरकारने 2018 साली कायदा करून मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले. त्यामुळे मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पुर्ण झाली, असं नरेंद्र पाटलांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“गुजरातसारखं महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची का?”

‘कोन है ये लोग, कहाॅं से आते है ये लोग’; आनंद महिंद्रांचा संतप्त सवाल

“नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते, त्यामुळेच…”

समीर वानखेडेंना कोर्टाचा मोठा झटका, दिला ‘हा’ मोठा निर्णय

अरे काय हे!… उद्घाटन होताच अजित पवारांनी डोक्याला हात लावला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More