बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा तसेच कोणत्याही वर्गाचा नाही”

बीड | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दरवर्षी दसरा मेळावा भगवानगडावर पार पडत होता. पण मागील तीन वर्षापासून हा मेळावा आता बीड जिल्ह्यातील संत भगवान बाबांच्या जन्मगावी पार पडत आहे. बीडच्या भगवानभक्तीगडावर शुक्रवारी दसरा मेळावा संपन्न होणार आहे. या दसरा मेळाव्याची तयारी सुरू असून या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

बीडमध्ये शुक्रवारी होणारा दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा तसेच कोणत्याही वर्गाचा नाही. शुक्रवारी होणारा दसरा मेळावा हा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा, वंचितांचा मेळावा आहे, असं सांगतानाच या मेळाव्याला येणारा कार्यकर्ता हा विचारांची उर्जा घेऊनच जातो, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडेचा दसरा मेळावा हा दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडत असतो. पण मागील वर्षी कोरोनामुळं हा मेळावा होऊ शकला नाही. तसेच हा मेळावा कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या आग्रहाखातर होत आहे. यावेळी तेथील मेळाव्याचं रूप कसं सुंदर आणि देखणं असणार आहे, हे तेथील येणाऱ्या लोकांवर अंवलबून आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, बीडमध्ये दसऱ्याला भगवान बाबांच्या भक्तीचा मेळावा जमत असतो. ह्रद्यातून निघालेला संवाद हा ह्रदयापर्यंत पोहोचत असतो. हीच खरी नेतृत्वाची ताकद आहे. तसेच हा मेळावा भक्तीची परंपरा आहे. लोकांनी आदेश द्यायचा आणि मी स्वीकारायचा हाच राजकारणाचा मुलमंत्र आहे, असंही पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी नोरा फतेहीला ईडीने बजावलं समन्स

SBI च्या ‘या’ भन्नाट योजनेत पैसे गुंतवा आणि मालामाल व्हा, वाचा सविस्तर

‘ट्विट करणाऱ्यांचे संस्कार महाराष्ट्राला कळले’, चाकणकरांचं प्रत्युत्तर

“एनसीबी एवढी मोठी एजन्सी पण गांजा आणि तंबाखूतील फरक कळत नाही”

‘औरंगजेबाच्या औलादी आहेत या पक्षात’; राष्ट्रवादी आमदाराच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे निलेश राणे संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More