मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी रविवारी दसरा मेळाव्यातील भाषणात भाजप, कंगणा राणावत, मोदी सरकार, नारायण राणे यांच्यावर टीकाचे बाण सोडले. या भाषणावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी समाचार घेतलाय.
पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना आशिष शेलार म्हणाले, शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा फ्लॉप शो होता. उद्धव ठाकरे यांना सत्ता टिकेल याविषयी फार शंका आहे. त्यामुळेच ते नेहमी सरकार पाडून दाखवा, अशी ओरड करतात.
मात्र यावर आमच्या नेत्यांनी आधीच सांगितलंय की, हिंमत असेल तर सरकार चालवून दाखवा. परंतु सध्याच्या परिस्थितीत हिंमत असेल तर बाहेर उतरून दाखवा, असं म्हणायची वेळ आली असल्याचा, टोलाही शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
शेलार पुढे म्हणाले, हिंदुत्वाच्या नावाखाली सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा नवीन आरोप होतोय. मात्र जे सरकार कर्माने पडणार आहे ते धर्माने पाडायची गरज नाहीये.
महत्त्वाच्या बातम्या
तीनच दिवसांपूर्वी झालं वडिलांचं निधन, आज केली वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी!
चंद्राच्या पृष्ठभागावर सापडलं पाणी; नासाच्या शास्त्रज्ञांचा दावा
उद्धव ठाकरे सत्ता येते-जाते, एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही – कंगणा राणावत
“महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार हे मुख्यमंत्र्यांना कळणारही नाही”