बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समलैंगिक असल्याने द्युती चंदला तिच्या बहिणीने घरातून बाहेर काढण्याची दिली धमकी

नवी दिल्ली | धावपटू द्युती चंदच्या समलैंगिक संबंधावर तिची मोठी बहिण नाराज आहे. एवढच नाही तर तिला घरातून बाहेर काढण्याची आणि तुरूंगात पाठवण्याची धमकी बहिणीने दिल्याचं द्युतीने सांगितले आहे.

द्युती चंदने आशिया क्रीडा स्पर्धेत भारताला दोन रौप्य मिळवून दिले आहेत. एका मुलाखतीत तिने तिच्या खासगी जीवनाबद्दल मोठा खुलासा केला आहे. आपले काही वर्षांपासून समलैंगिक संबंध असल्याचं तिने सांगितलं आहे.

गावातच असलेल्या मैत्रीणीसोबत माझे संबंध आहेत. पण तिची ओळख मी सांगणार नाही. विनाकारण ती लोकांच्या नजरेत येणं मला पसंत नाही, असं द्युतीने सांगितलं आहे.

दरम्यान, द्युती चंदने आशिया क्रीडा स्पर्धेत 100 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. आगामी वर्ल्ड अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि टोकियो ऑलम्पिक 2020 साठी तिचा सराव सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

-विधानसभेची तयारी पुढील महिन्यापासून- रोहित पवार

-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 24 ते 25 जागा मिळतील; अशोक चव्हाण यांचा दावा

-वृत्तवाहिन्यांवर निर्बंध आणण्यासाठी कायदा करणार- कुमारस्वामी

-पश्चिम बंगालमध्ये राडा; अर्जुन सिंह यांच्या ताफ्यावर हल्ला

-टीव्ही बंद करण्याची वेळ आलेय, केवळ 23 तारखेची वाट पाहायची- ओमर अब्दुल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More