मुंबई | आयपीएलच्या स्पर्धेत सध्या सुपर किंग्ज सध्या सहा पराभवांसह गुण तालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. तर चेन्नईच्या अडचणीत अजून एका अडचणीची भर पडली आहे. उर्वरित सामन्यांसाठी सीएसकेच्या अष्टपैलू खेळाडू नसणार आहे.
चेन्नईचा खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. दुखापतीच्या कारणामुळे त्याने माघार घेतली असून आता पुन्हा आता मायदेशी परतणार आहे. यामुळे चेन्नईला मोठा धक्का बसला आहे.
दिल्ली कॅपिटल्स सामन्याविरूद्ध ब्राव्होला दुखापत झाली होती. त्यानंतर ब्राव्होला एका मॅचसाठी आरामही देण्यात आला. मात्र त्याची दुखापत गंभीर असून ब्राव्होने माघार घेण्याचा विचार केलाय.
चेन्नई सध्या .दहा सामन्यात सात पराभव आणि तीन विजयामुळे सहा गुणांसह गुण तालिकेत तळाच्या स्थानावर आहे. त्यामुळे या टीमचं आव्हान सध्या संपुष्टात असल्याचं जमा आहे.
महत्वाच्या बातम्या-
संघात बदल करण्याची हीच योग्य वेळ- महेंद्रसिंग धोनी
नरेंद्र मोदी पंतप्रधान नसून दारूडे आहेत- प्रकाश आंबेडकर
राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खडसेंचे संकेत? मोदींविरोधातील ट्विट केलं रिट्विट
प्रचार सभेत तेजस्वी यादव यांच्यावर फेकल्या चपला, व्हिडीयो व्हायरल
दिलासादायक! देशात तीन महिन्यांनंतर आढळले 50 हजारांपेक्षा कमी रुग्ण