बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रत्येक दलित कुटुंबाला 10 लाख रुपये मिळणार; ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय

हैदराबाद | राज्यातील दलित समाजाच्या विकासासाठी तेलंगणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकार राज्यातील प्रत्येक दलित व्यक्तीच्या खात्यात 10 लाख रुपये जमा करणार आहे. सुरुवातीला राज्यातील 100 दलित कुटुंबाच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम सरकारद्वारे थेट कुटुंब प्रमुखाच्या खात्यात जमा होईल.

दलित समाजाच्या विकासासाठी असणाऱ्या मुख्यमंत्री दलित सशक्तीकरण योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1200 कोटी रुपयांचं बजेट ठेवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत रविवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री दलित सशक्तीकरण ही योजणा लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनविण्यासाठी आहे.

करिमनगरमधील एका दलित महिलेचा तुरुंगात मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत कॉंग्रेस नेते आणि मधिराचे आमदार मल्लू भट्टी विक्रम यांनी दलितांना आर्थिक मदत देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर राज्य सरकारने या मुद्यावर विचारविनिमय करत दलितांना 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, राज्यभरातून निवडलेल्या 11,900 कुटुंबांना ही मदत देण्यात येणार आहे.

या योजनेबद्दल बोलताना मुख्यमंत्री के. चंद्रशेखर म्हणाले होते की, दलितांबरोबर सामाजिक आणि आर्थिक भेदभाव केला जातो हा भारतीय समाजावरील एक डाग आहे. तेलंगणा सरकारने दलितांच्या विकास आणि कल्याणासाठी अनेक योजना आणि कार्यक्रम सुरू केले आहेत. मात्र, तरिही दारिद्र्य रेषेखालील दलित कुटुंबांना विकासाच्या दिशेने नेण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री दलित सक्षमीकरण कार्यक्रम सुरू केला जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘ओबीसी असल्याने मला महसूल खातं मिळालं नाही’; वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर थोरात म्हणाले….

डेल्टा प्लस व्हेरिएंटची चिंता करू नका; CSIR शास्त्रज्ञांनी केला मोठा खुलासा, म्हणतात…

तुझ्यात जीव रंगला’ मधील वहिणीसाहेबांच्या बाळाचा चेहरा अन् नाव आलं समोर

सकारात्मक बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या खाली, पाहा आकडेवारी

“20 टक्के लसीकरण झालेल्या देशात कोरोनाची तिसरी लाट नाहीच”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More