नाद एकच…फक्त बैलगाडा शर्यत, बैलगाडा प्रेमींसाठी मोठी अपडेट

Ear Tag | महाराष्ट्राच्या मातीतील खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत आहे. अशातच आता बौलगाडा शर्यतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर राज्यात बंदी होती. मात्र त्यानंतर कायद्याचा आधार घेत बैलगाडा शौकीनांनी न्यायालयात लढा दिला आणि मातीतला खेळ पुन्हा मातीत आला. आता याच मातीतल्या खेळातील बैलांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Ear Tag)

बैलाच्या कानाच्या बिल्ल्याचा आणि बैलगाडा शर्यतीचा संबंध काय?

मंडळींनो बैलगाडा खेळाला आता ग्लॅमरर्स स्वरूप आलं आहे. हे केवळ शाब्दिकच नाहीतर आता प्रात्यक्षिकरित्या समोर आलं आहे. कारण माणसाला जसा जन्माचा दाखला असतो. जातीचा दाखला असतो. इतर प्रशासनाने दिलेले कागदोपत्रे असतात. अगदी त्याचपद्धतीने बैलगाडा शर्यतीत बैलांच्या कानाला बिल्ला (Ear Tag) लावलेला असतो तोच बिल्ला (Ear Tag) त्याची सर्व काही ओळख असते असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. बिल्ला (Ear Tag) लावलेल्या बैलाला आता शर्यतीत खेळता येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तुम्हाला वाटलं असेल बैलाच्या कानाच्या बिल्ल्याचा आणि बैलगाडा शर्यतीचा संबंध काय? मित्रांनो बैलाच्या कानातील बिल्ल्याशी खूप काही संबंध लपला असल्याचं पाहायला मिळालं आहे. कानाला टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीत खेळण्यापासून लांब ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 1 जून रोजी शासनाने परिपत्रक काढलं आणि त्यात नमूद करण्यात आलं आहे.

बैलाच्या टॅगचं महत्त्व :

केंद्र सरकारच्या पशुधन विभागाने ‘नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन‘  ही पशुधन प्रणाली आणली आहे. या प्रणालीनुसार जनावरांच्या कानाला एक टॅग लावण्यात येतो. त्यामध्ये बारा अंकी टॅग लावण्यात येतो. त्यामध्ये पशुची आणि पक्षी यांच्या जन्म आणि मृत्युची नोंद घेण्यात येते. रोग प्रतिबंधात्मक लसीकरण आणि औषोधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकीहक्क हस्तांतरण याची नोंद ठेवण्यात येते.  म्हणजे जनावरांची सर्वी हिस्ट्रीच यात जमा होते, असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही.

पशुधनाची विक्री करताना इयर टॅगला महत्त्व आहे. इयर टॅग ही बारकोड पद्धत आहे. जी सॉफ्टवेअरमध्ये डेव्हलप केली आहे. याची सर्व नोंद ही भारत सरकारकडे असते. बाजारसमिती, आठवडी बाजार, खरेदी विक्री संघ यांनी इतर पशुधनाची खरेदी विक्री करताना हा टॅग दिला आहे की नाही यावर लक्ष द्यावं लागणार आहे. नसेल तर अशा विक्रींवर बंदी घालावी, असा शासनाने आदेश दिला आहे. यामुळे आता बैलगाडा शर्यतीत बैलगाडा शौकीनांनो बैलाच्या कानाला बिल्ला लावा. नाहीतर बैलगाडा शर्यतीत बैलांना स्पर्धेत उतरवण्यापासून कानाला खडा लावा.

News Title – Ear Tag Of Bull Big update Of Bulloc Cart Race

महत्त्वाच्या बातम्या

‘येत्या 4 जून रोजी…’; मनोज जरांगे यांची नवी घोषणा

‘…नाहीतर मी मुख्यमंत्री झालो असतो’; छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

पुणे हादरलं! बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षाच्या मुलाने भरधाव कारने दोघांना चिरडलं

जान्हवी कपूरने सांगितली धक्कादायक घटना; संपूर्ण बॉलिवूड हादरलं

‘अशा’ व्यक्तींपासून होईल तितकं दूर राहा; आयुष्यात खूप पुढे जाल