बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गावातली ग्रामपंचायत तरी खडसेंच्या ताब्यात आहे का?”

जळगाव |  जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांचा एकतर्फी विजय झाला आहे. त्यावरून जळगाव जिल्ह्यात आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गज उमेदवार असतानाही पराभवाच्या भीतीने भाजपने पळ काढला, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली होती. आता एकनाथ खडसेंच्या टीकेली गिरीश महाजनां प्रत्युत्तर दिलं आहे.

एकनाथ खडसे यांनी आपला विधानसभा मतदारसंघ सांभाळावा. आपल्या गावातली ग्रामपंचायत तरी त्यांच्या ताब्यात आहे का? असा सवाल करत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणूक काहीचं नाही. अद्याप जिल्हा बँकेचे मैदान समोर आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

भाजप हा घाबरणारा पक्ष नाही तर लढत देणारा पक्ष आहे, असं प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी दिलं आहे. तसेच आजची निवडणूक ही एकतर्फी झाली आहे, असंही महाजन म्हणाले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांचा गैरवापर करून त्यांनी सर्व उमेदवारांचे फॉर्म रद्द केले, असा आरोप गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केले आहेत.

कोणीही कर्ज काढलेले नसताना खो़ट्या कर्जाचे दाखले दिले. त्यांचे सहा सात उमेदवार बिनविरोध निवडूण आले आहेत. याकारणास्तव आम्ही आमचे फॉर्म मागे घेतले. ही निवडणुक आम्ही लढलोच नाही, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. तसेच एकच पॅनल होता.त्यामुळे विजय झाला की अपयश आले हा विषय गौण असल्याचं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

समीर वानखेडेंना कोर्टाचा मोठा झटका, दिला ‘हा’ मोठा निर्णय

अरे काय हे!… उद्घाटन होताच अजित पवारांनी डोक्याला हात लावला

गुटखा तस्करीत सापडला शिवसेना जिल्हाप्रमुख, शिवसेनेनं उचललं मोठं पाऊल

शरद पवार-अनिल परब बैठकीत नेमकं काय झालं; आली ‘ही’ माहिती समोर

“भरतासारख्या भावावर फक्त रामच प्रेम करू शकतात, आपण ते करू शकत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More