बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारत-पाक सामन्याआधी ‘विराट-बाबरचं वाकयुद्ध’; विराट कोहलीचं जोरदार प्रत्युत्तर

नवी दिल्ली | टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत आजपासून युएई आणि ओमान मध्ये सुरूवात झाली आहे. भारतीय चाहत्यांसोबत जगभरातील क्रिकेटप्रेमी भारत-पाक सामना बघण्यासाठी आतूर असतात.  अशातच आता पाकिस्तान संघाविरूद्ध भारत 24  तारखेला विश्वचषक स्पर्धेला सुरूवात करणार आहे. त्याआधी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि पाकचा कर्णधार बाबर आझम यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारत पाकिस्तान सामना स्टेडियमवर बघण्यासाठी चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात तिकीट खरेदी केली जाते. तसेच अनेक चाहत्यांना हा सामना पाहण्यासाठी तिकीट मिळत नाही. प्रत्येक सामना माझ्यासाठी इतर सामन्यासारखाच असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे. तर दुसरीकडे बाबर आझमने असा दावा केला आहे की, हा सामना आम्हीच जिंकू. यावर मी अशा दाव्यांवर विश्वास ठेवत नाही, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली आहे. त्यामुळे विश्वचषकाचा सामना होण्याआधी विराट आणि बाबरमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसतंय.

मला असं कधी जाणवलं नाही, की या सामन्याच्या तिकीटासाठी मागणी आणि विक्री जोरात सुरू आहे.  माझ्याकडे अनेक मित्र हे तिकीटासाठी संपर्क साधत आहेत. मात्र काही कारणास्तव त्यांना मला नकार द्यावा लागतोय. हा सामना खेळाडूवृत्तीने खेळायला हवा आणि आम्ही त्याच पद्धतीने मैदानात खेळू,  क्रिकेट चाहत्यांच्या दृष्टीने हा सामना वेगळा असेल, असं विराट कोहलीने म्हटलं आहे.

दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेसाठी मैदानात उतरणार आहे. विराट कोहलीसह, रोहित शर्मा, के.एल. राहुल, रविंद्र जडेजा, बुमराह अशी जमेची बाजू भारतीय संघात आहे. त्यामुळे 24 तारखेला होणारा सामना बघण्यासाठी चाहते वाट पाहत आहेत.

थोडक्यात बातम्या-

दिवाळीत कांदा पुन्हा रडवणार, कांद्याच्या भावात अचानक वाढ; जाणून घ्या कारण

‘भारताला हारव नाहीतर तुला पाकिस्तानात एन्ट्रीच नाही’; सामन्याआधी बाबर आझमला धमकी

राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागितली; ‘या’ मराठी चित्रपट दिग्दर्शकाला अटक

‘…तर समजून जावं नवरत्न तेलाने चंपी करण्याची वेळी आलीये’; मिटकरींची चंद्रकांत पाटलांवर टीका

रामलीला सुरु असताना राम नामाच्या गजरात दशरथने मंचावरच सोडले प्राण, प्रेक्षकांना वाटला अभिनय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More