“पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या संमतीने”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) आणि अजित पवार(Ajit Pawar) यांचा झालेला पहाटेचा शपथविधी आजापर्यंत महाराष्ट्राची जनता विसरू शकली नाही. आता याच पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

या पहाटेच्या शपथविधीत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. परंतु फक्त पाच दिवसांतच या दोघांनाही आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं.

आता या शपथविधीबाबत गौप्यस्फोट करताना फडणवीस म्हणाले की, या सरकारला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची संमती होती. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानं आमचा एक प्रकारे विश्वासघात झाला असल्याचंही फडणवीस म्हणाले. परंतु हा विश्वासघात छोटा होता, असंही ते म्हणाले.

दरम्यान, अजित पवारांनी शरद पवारांच्या परस्पर भाजपसोबत हातमिळवणी करून शपथ घेतली होती, या चर्चांणा आता फडणवीसांच्या गौप्यस्फोटामुळं एक प्रकारे पूर्णविराम मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-