Top News देश राजकारण

काँग्रेसमध्ये भूकंप? निम्म्यापेक्षा अधिक आमदार पक्ष सोडणार असल्याचा काँग्रेस नेत्याचाच दावा

पाटणा | बिहार काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. जवळपास ११ काँग्रेस आमदार पक्ष सोडणार असल्याचा दावा, काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार भरत सिंह यांनी केला आहे.

पक्षामध्ये लवकरच मोठी फूट पडणार असून ११ आमदार पक्ष सोडणार आहे, असे भरत सिंह यांनी म्हटलं आहे. मात्र काँग्रेसच्या हायकंमाडने भरत सिंह यांचा दावा फेटाळून लावला आहे.

जे ११ काँग्रेस आमदार पक्ष सोडणार आहेत. त्यांचे मार्गदर्शक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा, राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह आणि वरिष्ठ काँग्रेस नेते सदानंद सिंह हे आहेत.

राज्यपाल नियुक्त आमदारांचे नामांकन अद्याप बाकी आहे. त्यामुळे सदानंद सिंह आणि मदन मोहन झा हे राज्यपाल कोट्यातून आमदार होण्याच्या तयारीत असल्याचा आरोप भरत सिंह यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

आमदार दिलीप बनकरांच्या पुत्राच्या शाही विवाह सोहळ्याच्या चौकशीचे आदेश!

पोर्तुगालमध्ये Pfizer ची लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू!

“अंबानी, अदानी हे दोन उद्योगसमूह शेतीच्या ठेकेदारीत घुसतील आणि भविष्यात शेतकरी भिकेला लागेल”

“पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू”

MPSC, UPSC परीक्षांसदर्भात महत्त्वाची बातमी, वाचा सविस्तर माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या