नवी दिल्ली | दिल्लीला आज पहाटे पहाटे भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 2.3 इतकी नोंदवण्यात आली आहे.
दिल्लीच्या नांगलोई येथे हे भूकंपाचे धक्के जाणवले. साखर झोपेत असतानाच भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
लोक साखर झोपेत असतानाच भूकंपाचे धक्के जाणवल्याने अचानक जाग झालेल्या लोकांच्या मनात धस्स झालं. जमीन हालत असल्याचं पाहून स्थानिकांनी तात्काळ घराबाहेर पळ काढला.
भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचं नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने स्पष्ट केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
शेतकऱ्यांची पंतप्रधानांना काळजी नसून ते अत्यंत अकार्यक्षम आहेत- राहुल गांधी
“राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार”
कोणताही कायदा मराठा आरक्षण देऊ शकणार नाही- आनंद दवे
“राजू शेट्टी आता शेतकरी नेते राहिले नाहीत, त्यांच्यात हे सत्य स्वीकारण्याचं धाडस नाही”
“निवडणुका आल्या किंवा भाजप अडचणीत आल की शेतकर्यांच्या खात्यात लगेच पैसे जमा होतात”