बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के! जिल्हाधिकाऱ्यांनी केलं ‘हे’ आवाहन

गडचिरोली | विदर्भातील काही भागात रविवारी संध्याकाळच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. गडचिरोली आणि तेलंगणा सीमेवरील काही भागात रविवारी संध्याकाळी पाऊणे सात वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीच्या माहितीनूसार हा भूकंप 4.3 रिश्टर स्केलचा होता.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे धक्के बसले. आलापल्ली, गुड्डीगुडम, रेपनपल्ली, देचलीपेठा, बोरी, कमलापूर, जिमलगट्टा, आष्टी आणि सिरोंचा हे भाग भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरले. अचानक बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं होतं.

भूकंपाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी संजय मीना यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे. आत्तापर्यंत कोणतीही मालाची किंवा मानवी हानी झाल्याचं वृत्त नाही त्यामुळे कोणीही दहशत आणि भीती पसरली जाईल, असे संदेश पाठवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

संध्याकाळी पाऊणे सातच्या सुमारास आलेल्या भूकंपाने दरूर गावासह परिसरातील घरात भांडे खाली पडल्याचा प्रकार घडला. तर काही भागात नागरिकांना सौम्य हादरा बसल्याचं समोर आलं आहे. काल बसलेल्या भूकंपासंदर्भातील माहिती गोळा करण्याचं काम सुरू असल्याचं तहसीलदार के.डी.मेश्राम म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“आर्यन खानसोबत जे काही घडलं त्याचं एक आई म्हणून वाईट वाटतं”

इकडे क्रांती रेडकर चिंतेत तर दुसरीकडे आठवलेंच्या कवितांची गाडी सुसाट

एकीकडे सर्वसामान्यांचं दिवाळं तर दुसरीकडे इंधन विक्रीतून केंद्र सरकारची दिवाळी

‘तीन लोकांनी आमच्या घराची रेकी केली’, क्रांती रेडकरांचा गंभीर आरोप

सुपरस्टार रजनीकांत यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची अपडेट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More