मोठी बातमी! ‘या’ राज्यांना भूकंपाचे झटके

नवी दिल्ली | भारतात (India) भूकंपाच्या झटक्याचे प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. अशातच मंगळवारी सकाळच्या सुमारास दिल्ली एनसीआर, यूपी आणि बिहारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्या भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी रेक्टर स्केल (Rector scale) होती.

या भूकंपामुळे काही काळासाठी दिल्ली, यूपी(UP),बिहारमध्ये (Bihar) भितीचे वातावरण निर्माण झालं होतं. दिल्लीसह यूपीमधील मुराहाबाद, आमरोह आणि रामपुरमध्ये देखील दुपारी 2.30 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

हा झालेला भूकंप (Earthquake) थोडा तीव्र स्वरुपाचा असल्यानं घरात आणि ऑफीसमध्ये काम करणाऱ्या लोकांना भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. त्यामुळं त्याच क्षणी लोकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी (loss of life) झाली नाही.

नॅशनल सेंटर ऑफ सिस्मालाॅजीनुसारच्या (National Center of Seismology) मते या भूकंपाचे केंद्र नेपाळ पासून 12 किमी सांगितलं जात आहे. दरम्यान, यापूर्वी 5 नोव्हेंबरला दिल्लीत भूकंपाचे झटके जाणवले आहेत. चीन, नेपाळ आणि भारतासारख्या ठिकाणी असे भूकंपाचे हादरे वारंवार येत असतात.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More