बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाची लस घेतल्यानंतर ‘या’ गोष्टी खाल्ल्याने होणार नाही साईड इफेक्ट

मुंबई | देशभरात कोरोनानं भयानक रूप धारण केलं आहे. त्यामुळं दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत चालली आहे. सध्या जगात कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय सांगितला जात आहे. त्यामुळे भारतासह इतर देशात देखील लसीकरण मोहिम राबवल्या जात आहेत. कोरोनावरील लस घेतल्यानंतर काहींना त्या लसींचा साईड इफेक्ट होत असल्याचं सांगण्यात येत आहे. लस घेतल्यानंतर खालील गोष्टी आहारात घेतल्यानंतर साईड इफेक्ट होणार नाही असं डाॅक्टरांच म्हणणं आहे.

हिरवा भाजीपाला – आपल्या जेवणात हिरवा भाजीपाला असावा. यात पालक, ब्रोकोली, सारख्या भाज्या असणं आवश्यक आहे. यासर्व भाज्या होणारा त्रास कमी करतात. त्यामुळे फक्त लस घेतल्यानंतरच नाही तर दररोजच्या आहारात देखील हिरव्या भाजीपाला असाव्यात.

ब्लू बेरीज – ब्लू बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. सेरोटोनिनची पातळी वाढवण्यासाठी ब्लू बेरीज खूप फायदेशीर आहेत. प्रोबायोटिक अधिक असलेल्या दहीसह ब्लू बेरीज खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असं डाॅक्टर सुचवतात.

कांदा आणि लसून – कांदा आणि लसून या दोन्ही वस्तू इम्यूनिटी वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे प्रोबायोटिक्समध्ये समृद्ध आहे जे आपल्या आतड्यात प्रोबायोटिक्स (चांगले बॅक्टेरिया) पोसतात. त्यामुळे दररोजच्या आहारात कांदा आणि लसून घेणं आवश्यक आहे.

हळद – सूज कमी करण्यासाठी हळद खूप फायदेशीर आहे. यासह तणावापासून वाचण्यासाठी हळद गुणकारी आहे. यासाठी हळदीचे सेवन करणं आवश्यक आहे. दुधात हळद टाकून पिणं आरोग्यासाठी कधीही फायद्याच असतं.

तर कोरोनापासून वाचण्यासाठी आपल्याला आपल्या जेवणात वेगवेगळ्या प्रकारची ताजी फळं आणि ताज्या अन्नाचा समावेश ठेवायला हवा. ज्या अन्नपदार्थांमधून आपल्याला विटामीन, मिनरल्स, फायबर, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडेंट मिळतील.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन

होम क्वॉरंटाईन होऊन घरून उपचार घेत असाल तर सावधान;’या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं ठरू शकतं धोकादायक

“…तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांड्या लावाव्या लागतील”

“कोरोना काळात राजकारण करू नका पण, उद्धवजी हे ऐकतील का?”

“या उपटसोंड्याला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून लोकांचे हाल काय कळणार?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More