ईव्हीएमवर शंका घेतल्यास मानहानीचा खटला दाखल होणार?

नवी दिल्ली | ईव्हीएमवर संशय घेतल्यास यापुढे मानहानीच्या खटल्यांना सामोरं जावं लागू शकतं. ईव्हीएमप्रति अविश्वास दाखवून लोकांमध्ये ईव्हीएमची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर खटला चालवण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगानं केंद्र सरकारकडे केलीय. 

आयोग केंद्र सरकारचे एजंट म्हणून काम करीत असल्याचा आरोप राजकीय नेत्यांनी केला होता. यामुळे व्यथित झालेल्या निवडणूक आयोगाने हे पाऊल उचललं आहे.