राहुल गांधींवर आचारसंहिता भंगाचा ठपका, भाजप नेते मात्र मोकाट!

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा ठपका ठेवला आहे. काँग्रेसने मात्र ही कारवाई एककल्ली असल्याचं म्हणत भाजप नेत्यांकडेही बोट दाखवले आहे.

राहुल यांची मुलाखत दाखवणाऱ्या वाहिन्यांविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच राहुल यांना 18 डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिलेत.

दरम्यान, राहुल यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई होत असेल तर निवडणूक आयोग पंतप्रधान, अर्थमंत्री, केंद्रीय मंत्री आणि भाजप अध्यक्षांवर मेहेरबान का? असा सवाल काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी विचारलाय.