मोठी बातमी! शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची मान्यता

Sharad Pawar NCP | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. शरद पवार यांच्या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. आज याबाबत सुनावणी पार पडली.

कलम 29 ब नुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे. त्यामुळे पक्षाला आता दिलासा मिळालाय. यापुढे शरद पवार यांच्या पक्षाला देणगी स्वीकारण्यासाठी अधिकृत मान्यता (Sharad Pawar NCP) देण्यात आली आहे.

शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाची मान्यता

या निर्णयानंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आज दिल्लीमध्ये आमच्या चार वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या होत्या. शरद पवार यांचा पक्ष ज्याप्रकारे काढून घेण्यात आला, पण जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल आभार. तसंच आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात दिलं गेलं होतं. मात्र, आम्हाला चेक घेण्याचा अधिकार नव्हता. तसेच टॅक्स बेनेफिट मिळत नव्हता. आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

तसंच “तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी दुसरी तुतारी देण्यात येऊ नये अशी विनंती आम्ही केली. हा अन्याय (Sharad Pawar NCP) इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये, अशीही आम्ही विनंती केली. यावर आयोगाने अभ्यास करू असं सांगितलंय.”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

केंद्रीय निवडणूक आयोगात पार पडली सुनावणी

दरम्यान, येत्या 16 जुलैरोजी राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. आता हा निर्णय कुणाच्या बाजूने लागणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे 8 खासदार निवडून आले आहेत.

यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या आधारे (Sharad Pawar NCP) संख्याबळाचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. आता याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार?, याबाबत सर्वांना उत्सुकता असेल.

News Title – ECI Approve Sharad Pawar NCP

महत्वाच्या बातम्या-

कोट्यावधींचे 24 भव्य आश्रम, महागड्या गाड्या; भोलेबाबाची एकूण संपत्ती किती?

मोठी बातमी! ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी

..अन् अभिनेत्रीने थेट सलमान खानच्या कानाखाली लगावली; नेमकं असं काय घडलं होतं?

मुंबईतील मुसळधार पावसानंतर अजित पवारांचं ट्विट; म्हणाले,”हवामान बदलामुळे..”

नवी मुंबईतील रेल्वेरूळावर घडली धक्कादायक घटना, महिलेच्या पायावरून थेट….