मुंबई | राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज सादर केला. आर्थिक पाहणी अहवालातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकाला आला असून कर्जाचा बोजाही वाढल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 1 लाख 91 हजार 737 रुपये असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. शिवाय मागील वर्षीच्या तुलनेत राज्यात दीड लाख रोजगार कमी झाला असल्याचं समोर आलं आहे. गेल्यावर्षी 73 लाख 50 हजार रोजगार उपलब्ध होता. 2019-20 या वर्षात राज्यातील रोजगारात घट होऊन तो 72 लाख 3 हजारांवर आला आहे.
राज्याचा बेरोजगारीचा दरही इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याचं दिसून येत आहे. राज्याचा बरोजगारी दर 8.3 टक्के आहे. पश्चिम बंगलचा बेरोजगारी दर 7.4 टक्के, पंजाबचा 7.6 टक्के, कर्नाटकचा 4.3 टक्के, गुजरातचा बेरोजगारी दर 4.1 टक्के आहे. बेरोजगारीच्या बाबतील महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे.
आर्थिक मंदीमुळे राज्याचा विकास दर 7.5 टक्क्यांवरुन 5.7 टक्के राहिल, असा अंदाज या आर्थिक सर्वेक्षणात नोंदवण्यात आला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
अयोध्येला जाता त्याप्रमाणे शेतकऱ्यांकडेही जा- बच्चू कडू
दाभोळकर हत्याप्रकरणातील महत्वाचा पुरावा सीबीआयच्या हाती!
महत्वाच्या बातम्या-
“हा केतकर दररोज कांबळे-पवार यांच्या दिग्दर्शनाखाली काम करतो”
देशातील सहा कोटी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा मोठा झटका!
फ्लिपकार्टच्या सचिनविरोधात पत्नी आणि मेव्हणीचे अत्यंत धक्कादायक आरोप
Comments are closed.