बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार ‘या’ तीन अर्थशास्त्रज्ञांना जाहीर!

नवी दिल्ली | अमेरिकेच्या फास्ट-फुड क्षेत्रातील किमान वेतन वाढीचा परिणाम हा कॅस्टो युग क्युबाच्या वास्तविक क्षेत्रावरील स्थलांतरावर होत आहे. तसेच त्याचबरोबरच त्याचा जागतिक आर्थिक परिणाम दर्शवण्यासाठी ‘नैसर्गिक प्रयोगाला’ यंदाचा अर्थशास्त्रातील पुरस्कार देण्यात आला आहे. अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड कार्ड, जोशुआ अँग्रिस्ट आणि गुईडो इम्बेन्स यांना संयुक्तपणे 2021 चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

औषध किंवा इतर विज्ञानांप्रमाणे अर्थशास्त्रज्ञ काठिण्य पातळीवर क्लिनिकल चाचण्या करू शकत नाहीत. त्याऐवजी नैसर्गिक प्रयोग तत्वावर जगावरील परिणामांचा अभ्यास करण्यासाठी वास्तविक जीवनातील परिस्थिीतीचा वापर करतात. त्यामुळे त्यांच्या संशोधनामुळे मुख्य कारणांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता लक्षणीयरित्या सुधारली आहे. ज्याचा समाजाला खूप फायदा होणार आहे, असं आर्थिक विज्ञान पुरस्कार समितीचे अध्यक्ष पीटर फ्रेडरिकसन म्हणाले.

कॅनडामध्ये जन्मलेले कार्ड सध्या कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये काम करीत आहेत. अँग्रिस्ट हे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नाॅलॉजीमध्ये तर स्टॅनफोर्ड विद्यापीठात गिडो इम्बेन्स कार्यरत आहेत.

दरम्यान, मागील वर्षी लिलाव सिद्धांत सुधारणा आणि लिलावाच्या नव्या पद्धतींचा शोध लावल्याबद्दल पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन यांना देण्यात आला होता. स्वीडीश अॅकडमी ऑफ सायन्स या समितीने या पुरस्कारची घोषणा केली आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

“इतक्या मतांनी निवडून द्या की, मी म्हणणाऱ्यांची बोबडी वळायला पाहिजे”

“आघाडी सरकारचा पोपट झाला, तिन्ही पक्षांनी उरली सुरली इज्जत मातीत मिळवली”

”नेतेगिरी म्हणजे लुटणं नाही, फॉर्च्युनरने चिरडण्यासाठी मी राजकारणात आलो नाही”

“त्याचं आडनाव ‘खान’ असल्यानं त्याला त्रास दिला जातोय”

“अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More