जालना | शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत फूट पडली. त्यातच ईडीने शिवसेनेच्या आणखी एका बड्या नेत्यावर कारवाई केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच ईडीने खोतकरांच्या जालन्यातील सहकारी साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ईडीने मोठी कारवाई करत या साखर कारखान्याची जमीन जप्त केली आहे.
ईडीने सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत व प्लांट जप्त केले आहेत. यासोबतच ईडीने कारखान्याची यंत्रसामग्री देखील जप्त केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत होती.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबधित प्रकरणात पीएमएलए अंतर्गत ही कारवाई केली असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘हा भाजपचा डाव’, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर मुख्यमंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया
‘बंडखोरांना पश्चिम बंगालमध्ये पाठवा..’, महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात ममता बॅनर्जींची उडी
गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लिन चीट, वाचा सविस्तर
‘l love Uddhav Thackeray…’; प्रसिद्ध गायक लकी अलींची पोस्ट चर्चेत
शिंदे गटातील आणखी 5 आमदारांना मोठा झटका बसण्याची शक्यता!
Comments are closed.