मुंबई | लडाख आणि कश्मीरातील दुश्मनांशी आपले सैन्य लढत आहे, त्यांच्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्याविरोधात जुंपावे, असा खोचक सल्ला शिवसेनेने केंद्र सरकारला दिला आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. ईडीच्या या कारवाईनंतर केंद्र सरकार ईडीचा वापर राजकीय विरोधकांविरोधात करत असल्याचा आरोप शिवसेनेने यापूर्वी केला होता. तसेच या कारवाईविरोधात शिवसेनेने सामनाच्या आग्रलेखातून आवाज उठवला आहे.
देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरूच आहे. त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी. असे शिवसेनेने सामना अग्रलेखात म्हटले आहे.
प्रत्येक वेळी बंदुकांनीच काम होते असे नाही. दिल्लीच्या सीमेवर आपल्याच शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून मारले जात आहे, तर कश्मीर सीमेवर अतिरेकी आमच्या सैनिकांचे बळी घेत आहेत. तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा! त्याशिवाय पर्याय नसल्याचेही शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
काही राजकीय पक्षांना ऊत आलाय, गर्दी जमवून आंदोलन करणं टाळा- किशोरी पेडणेकर
“ड्रायव्हर मुख्यमंत्री चालेल, नारायण राणे सारखा डराव डराव करणारा बेडूक नको”
…तर देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो- उदयनराजे भोसले
“शिवसेना आणि राष्ट्रवादीनेच नितीन राऊतांचा गेम केला”
पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणं दुर्दैवी- संजय राऊत