बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाऊस आणि ईडी राष्ट्रवादीसाठी फायद्याची- सुप्रिया सुळे

चंद्रपूर | 2019 च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ईडीकडून नोटीस आली होती. त्यावरून राज्यातलं राजकारण बरचं तापल होतं. सातारा येथे श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार स्टेजवर भाषण करायला गेले असता तिथे जोरदार पाऊस आला होता. पाऊस सुरू असताना शरद पवारांनी भाषण केलं होतं. या भाषणाचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम झाल्याचं दिसलं होतं. त्यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी  ईडी आणि पाऊस राष्ट्रवादीसाठी फायद्याचं असल्याचं म्हटलं आहे. त्या चंद्रपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

चंद्रपूर येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आणि आढावा बैठक पार पडली. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत ईडी बाबत वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ईडी लावली. त्याचा आम्हाला फायदा झाला. राज्यात सत्ता आली. ईडी आणि पाऊस राष्ट्रवादीसाठी फायद्याची आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलं आहे. मी लोकसभेची खासदार आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एखादी महिला असावी हा विषय माझ्यासाठी नाही. मुळात पुरूष आणि महिला असा भेदभावचं करू नये, असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप केला होता. त्यावरून आम्ही कोणत्याही चौकशांना घाबरणार नाही. गैरव्यवहार आणि बेहिशोबी मालमत्तेचे पुरावे असतील तर त्यांनी संबंधित यंत्रणेकडे द्यावेेत,असं आवाहनचं सुप्रिया सुळे यांनी केले आहे. काही लोकांना प्रसिद्धीसाठी आरोप करण्याची सवय झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“भाजपने बेईमानी केली नसती तर उद्धवसाहेब देखील बेईमान झाले नसते”

‘आठवण करून देतोय, बाप बाप असतो!’; रामदास कदमांच्या बॅनरबाजीने सर्वांच्या भुवया उंचावल्या

“निर्णय तर मोदींचा होता पण, त्यामागे डोकं कोणाचं होतं?”

भारत-पाक सामन्याआधी ‘विराट-बाबरचं वाकयुद्ध’; विराट कोहलीचं जोरदार प्रत्युत्तर

“काही लोक गांजा मारून काम करतात, त्यांची नार्कोटेस्ट करावी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More