मुंबई | मुंबईबाहेरुन आल्यामुळे शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी विलगीकरणात असल्याचं कारण सांगत ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केली होती. याला ईडीने उत्तर दिलं आहे.
प्रताप सरनाईक यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर ईडीसमोर हजर राहा, असा आदेश प्रताप सरनाईक यांना देण्यात आला आहे.
ईडीने मंगळवारी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली.
बुधवारी प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वारंटाईन राहावं लागत आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ; पुन्हा आढळले 1 हजारांहून अधिक रूग्ण
जास्त अंगावर आलात तर…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर
“गरज पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू”
प्रताप सरनाईकांच्या निकटवर्तीयांना अटक, मुलाची पुन्हा चौकशी