Top News महाराष्ट्र मुंबई

ईडी प्रताप सरनाईकांना अटक करु शकत नाही- सर्वोच्च न्यायालय

मुंबई | ईडीच्या रडारवर असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांच्या मानेवर ईडीकडून अटक होण्याची टांगती तलवार होती. त्यांना 10 डिसेंबरपूर्वी चौकशीसाठी ईडीसमोर हजर रहायचे होते. परंतू या प्रकणासाठी सरनाईकांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिलं आहे.

सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशानुसार, प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश दिले आहेत. ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवू शकते. मात्र त्यांना अटक करु शकत नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

काल 8 डिसेंबर रोजी प्रताप सरनाईक यांनी सहकुटुंब मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. याचे व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले असून आज सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय आल्याने सरनाईकांना सिद्धिविनायक गणपती पावला,असे बोललं जातं आहे.

दरम्यान, 24 नोव्हेंबरला टॉप ग्रुप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपूत्र विहंग आणि पुर्वेश सरनाईकांच्या घरावर ईडीने छापे मारले होते.

थोडक्यात बातम्या-

फडणवीस सरकारचा ‘हा’ निर्णयही ठाकरे सरकारने केला रद्द

“मुंबईच्या ‘या’ रुग्णालयात केला जाणार कोरोना लसीकरणाचा पहिला प्रयोग”

पृथ्वीवर एलियन्स लपले आहेत; इस्त्राईलच्या संशोधकाचा खळबळजनक दावा

कोरोनानंतर भारतात आलाय रहस्यमय आजार; आकडी येऊन बेशुद्ध पडत आहेत लोक

‘राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथी मधला फरक तरी माहित आहे का?’; मुख्यमंत्र्यांची टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या