मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) पती व उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या अडचणीत आणखी एकदा वाढ झाली आहे. ईडीने (ED) राज कुंद्रांविरोधात फेमा (Foreign Exchange Management Act) अंतर्गत गुन्हा दाखल केल्याने राज कुंद्रांना पुन्हा एकदा अटक होण्याची शक्यता आहे.
पॉर्न रॅकेटमधून मिळालेली रक्कम राज कुंद्रा यांच्या ‘विहान’ कंपनीत मेंटेनन्सच्या नावाखाली जमा केली जात होती. विहान कंपनीच्या तब्बल 13 बँक खात्यांमध्ये लाखो रूपयांचे व्यवहार झाले असल्याचं ईडीचं म्हणणं आहे.
राज कुंद्रा यांच्या विहान कंपनीशी संबंधित सर्व बँक खात्यांमध्ये पॉर्न चित्रपटांच्या कमाईतून झालेले उच्च प्रमाणातील व्यवहार ईडीच्या हाती लागले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार ईडीने राज कुंद्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, अश्लील चित्रपट बनवणं आणि ते मोबाईल अॅपवरून प्रसारित केल्याप्रकरणी राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी 2021 मध्ये अटक केली होती. राज कुंद्रा सध्या जामिनावर बाहेर असून ईडीने मोठा झटका देत त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
थोडक्यात बातम्या-
दीपाली सय्यद यांनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं, म्हणाल्या…
‘या’ लोकांनी का घेऊ नये कोरोनाचा दुसरा बूस्टर डोस?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती
“पुरून उरेल तुम्हाला… चित्रा वाघ म्हणतात मला”
धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना दिली महाविकास आघाडीत यायची ऑफर?, म्हणाले…
राज ठाकरेंची सभा होणार?, मनसे उद्या महत्त्वाची घोषणा करणार
Comments are closed.