“निवडणुकांचे निकाल जे करू शकले नाहीत ते ईडीने करून दाखवले”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून विरोधकांनी भाजपला(BJP) चांगलेच धारेवर धरले होते. आता या सगळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) बुधवारी लोकसभेत उत्तर दिले.

मोदी लोकसभेत बोलताना म्हणाले की, आम्ही नऊ वर्षांचा काळ पाहिला आहे. परंतु आता विरोधक एकत्र आले आहेत. मिले-तेरा मेरा सूर अशी विरोधकांची परिस्थीती आहे.

या लोकांनी ईडीचे(ED) आभार मानले पाहीजेत कारण ईडीने यांना समान व्यासपीठावर आणण्याचे काम केले आहे. निवडणुकांचे निकाल जे करू शकले नाहीत ते ईडीने केले, असंही मोदी म्हणाले.

काही लोकांच्या भाषणातून त्यांची योग्यता समजते, असा टोला त्यांनी राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना लगावला. तसेच 2 जी आणि काॅमनवेल्थ घोटाळ्यावरूनही मोदींनी काॅंग्रेसवर(Congress) निशाणा साधला.

जगात भारताच्या विकासाची प्रगती दिसत आहे. परंतु निराशेच्या गर्तेत बुडालेल्या काहींना देशाची प्रगती मान्य नाही. 140 कोटी देशवासीयांचे कष्ट त्यांना दिसत नाही, असा टोलाही त्यांनी काॅंग्रेसला लगावला.

महत्त्वाच्या बातम्या-