बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याला ईडीचा झटका!

मुबंई | सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. ईडीने प्रफुल पटेल यांची संपत्ती जप्त केली आहे. मुंबईतल्या वरळी येथील त्यांच्या घरावर ही कारवाई करण्यात आली आहे.

2019 च्या इकबाल सी जी हाऊसच्या मनी लाॅड्रींग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ऑक्टोंबर 2021 मध्ये यासंबधी 12 तास प्रफुल पटेल यांची चौकशी करण्यात आली होती. ज्या ठिकाणी सध्या प्रफुल पटेल यांचा फ्लॅट आहे. तेथे यापूर्वी मिर्ची या दाऊदच्या जवळील सहकाऱ्याची जागा होती. मिर्ची यांच्या परदेशातील जागेवरही ईडीने (ED) छापे टाकले आहेत.

दरम्यान हा फ्लाॅट प्रफुल पटेल आणि त्यांचे कुटुंब वापरू शकते, मात्र त्यांच्या विक्रीसंबधी निर्णय घेऊ शतक नाही. याची विक्री करताना त्यांना ईडीची परवानगी घ्यावी लागेल.

ईडीने आपला मोर्चा आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) वळवला आहे. अशी चर्चा राजकीय गोटात सुरु आहे. राष्ट्रवादीच्या तिसऱ्या नेत्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. सध्या ते तुरुगांत आहेत.

थोडक्यात बातम्या

अत्यंत सुमार दर्जाचा ट्रेलर!, ‘मी पुन्हा येईन’ फ्लॉप होण्याची शक्यता

“मी इंदिरा गांधींची सून आहे, मी कोणालाही घाबरत नाही”

‘शिवसेना फोडण्यामागे शरद पवार नाही, तर…’; केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा; सर्व सण धुमधडाक्यात साजरे होणार

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More