ईडीच्या कारवाईने दिल्लीत गोंधळ; काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची चौकशी सुरू
नवी दिल्ली | राज्याचं राजकारण गेल्या दोन वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून तापलेलं आहे. अशातच आता दिल्लीतही ईडीची कारवाई झाल्याचं समोर येत आहे. ज्येष्ठ काॅंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांची सक्तवसूली संचनालयाकडून चौकशी सुरू आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे यांची चौकशी सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नॅशनल हेराल्ड प्रकरण गाजत आलं आहे. अनेक काॅंग्रेस नेत्यांवर या प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. अशात आता हेराल्ड प्रकरणात खरगेंची चौकशी झाल्यानं सर्वत्र राजकारण पेटलं आहे.
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आलेल्या खरगेंची अद्यापी चौकशी सुरू आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 साली नॅशनल हेराल्ड प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेलं होतं. या प्रकरणात काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांना देखील न्यायालयानं नोटीस बजावलेली आहे.
दरम्यान, खरगे हे सध्या काॅंग्रेसमधील आघाडीचे नेते मानले जातात. राज्यसभा विरोधी पक्षनेते असल्यानं खरगे यांच्याकडं काही विशेषाधिकार आहेत. त्यामुळे आता खरगे यांच्या चौकशीतून काय बाहेर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
देशातील कोरोना रूग्णांबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
“मातोश्रीत बसून सत्ताफळं खाणाऱ्यांनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात”
महाराष्ट्रातील ‘या’ भागात अवकाळी पाऊस कोसळणार
‘गोरं मूल जन्माला यावं म्हणून सानियाने…’, शोएब मलिकचा खुलासा
सिनेसृष्टी हादरली, मुलाच्या मृत्यूच्या 2 महिन्यातच ‘या’ अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास
Comments are closed.