बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ईडी म्हणजे पान तंबाखुचं दुकान झालंय, समझनेवालों को इशारा काफी होता है”

सोलापूर | गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडी, सीबीआय आणि एएनआय या संस्थांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यावरून केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय सुडबुद्धीने गैरवापर करण्यात येत आहे, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेस नेत्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी ईडी कारवाईवरून ईडी म्हणजे पान तंबाखुचं दुकान झालंय, असं वक्तव्य केलं आहे.

भाजपच्या काळात ईडी, सीबीआय या स्वायत्त संस्थांचा वापर राजकारणासाठी केला जात आहे. आज मी यांच्याविरोधात बोलते उद्या माझ्या घरातही ईडी येईल. ईडी म्हणजे पान तंबाखुचं दुकान झालंय, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

यावेळी प्रणिती शिंदे यांनी लखीमपुर खीरी येथील  शेतकरी हिंसाचारावरून भाजपवर टीका केली आहे. जे दोषी आहेत ज्यांनी शेतकऱ्यांना मारलं आहे, ते बिंधास्त फिरत आहेत. जे निर्दोष आहेत त्यांना जेलमध्ये टाकलं आहे, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आज देशात भीतीचं वातावरण तयार झाले आहे. काही लोक भीतीने घरात बसले आहेत. कधी कोणाच्या घरात घुसतील सांगता येत नाही, असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. देशात भीती निर्माण करण्याचं काम भाजप आणि मोदीजी करत आहेत, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.या लोकांनी काय हाल करून ठेवले आहेत असं म्हणतानाच समझनेवालो को इशारा काफी होता है, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

पुन्हा राज्यानं पाहिला नानाभाऊंचा कणवाळूपणा! लोककलावंताला दिलं हक्काचं घर

विराट कोहलीने ठोकलं दमदार अर्धशतक! पाकला दिलं ‘इतक्या’ धावांचं आव्हान

लखीमपूर खीरी घटनेतील मुख्य आरोपीला झाली डेंग्युची लागण

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More