Top News महाराष्ट्र मुंबई

‘सीबीआय’नंतर राज्यात ‘ईडी’लाही ‘नो एंट्री’???; गृहमंत्र्याचं सूचक वक्तव्य

मुंबई | महाविकास आघाडीतील नेत्यांना ई़डीच्या नोटीसा येत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीटी नोटीस आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संताप व्यक्त करत सूचक असं वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रात सीबीआयला कोणत्याही प्रकरणाचा तपास करायचा असेल तर राज्य सरकारची परवानगी घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि भाजपचे नेतेमंडळी ‘ईडी’ला हाताशी घेऊन सूडाचं राजकारण करत असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

‘ईडी’च्या आडून भाजप सुडाचं राजकारण करत आहे. याआधी केंद्र सरकारच्या धोरणांबाबत बोलल्यावर सीबीआय चौकशी होत होती आता ईडीच्या नोटीसा येत असल्याचं देशमुख म्हणाले.

दरम्यान, सीबीआयला महाराष्ट्रात तपास करायचा असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते तसाच निर्णय ईडीबाबतही घेण्याती गरज असल्याची मागणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘भारतीय हद्दीतील काश्मीरमधील लोकांवर अत्याचार होत आहे’; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला

सायरस पुनावाला यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं- बाळा नांदगावकर

भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला अपघात!

“संजय राऊत यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा”

‘सत्ता विश्वासघाताने मिळवता येते पण…’; भाजपची शिवसेनेवर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या