मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा सपाटा सुरु आहे. ईडीच्या कारवाईमुळे महाविकास आघाडीचे अनेक नेते अडचणींत सापडल्याचं पहायला मिळत आहे. आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत अनेक खुलासे करणार आहेत. सध्या सगळ्यांचं लक्ष राऊतांच्या पत्रकार परिषदेकडे लागलं आहे.
दुसऱ्या राज्यात तपास यंत्रणा अॅक्टिव्ह नाहीत. कर्नाटक, उत्तराखंड, यूपी, गुजरातमध्ये तपासयंत्रणा का अॅक्टिव्ह नाहीत? हा प्रश्न देशातल्या तमाम जनतेला पडलाय. त्यामुळे मी जे सत्य आहे तेच मांडण्याचा प्रयत्न करतोय, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ईडीचे अधिकारी कुणाला धमकावतात, कुणाला खंडणी मागतात, त्यासंदर्भातील माहिती माझ्याकडे आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार मी आज उघड करणार, असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ‘ईडी ही भाजपची ATM मशीन आहे’, असं म्हणत संजय राऊत कडाडले.
दरम्यान, सकाळपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचे धाडसत्र सुरू असताना राऊतांनी ही पत्रकार परिषद घेतलीय. यात संजय राऊतांनी अनेकांची नावं घेतली आहे. त्यामुळे अजुन काय खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
“शिवसेनेला त्रास देण्यासाठी ईडीच्या धाडी सुरु आहेत”; संजय राऊतांचा हल्लाबोल
“महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही”
‘एसटी संपावर लवकर निर्णय द्या, अन्यथा…’; सदाभाऊ खोत आक्रमक
“अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही, मोठेपणा दाखवायचं बंद करा”
दिशा सालियन प्रकरणी नितेश राणेंच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!
Comments are closed.