“ईडी आहे की घरगडी आहे हेच कळत नाही”
मुंबई | राज्यात सुरू असणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेचं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप केले आहेत. तपास यंत्रणाच्या कारवाईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
मी बदनामी आणि टीकेला घाबरत नाही. पण कोणत्या थराला जायचं?, नवाब मलिकांचा राजीनामा तथ्य असेल तर घेऊ. मात्र, आरोपांमध्ये तथ्य तर पाहिजे ना. एखादा नेता चार पाच वेळा निवडून येतो. मंत्री बनतो, तरी केंद्राच्या यंत्रणांना माहिती नाही. केंद्राच्या यंत्रणा इतक्या पोकळ झाल्या आहेत का?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
केंद्राच्या एजन्सी म्हणजे बाण झाल्या आहेत. हातात घ्यायचं आणि लक्ष्यावर मारायचं. केंद्राने तुम्हाला रॉ किंवा सीबीआयमध्ये घ्यायला पाहिजे. असं मी वाचलं आहे की, ईडी आहे की घरगडी, हेचं कळत नाही, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. हे सर्व होतयं आणि कोण बघत नाही, असं समजू नका, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
दरम्यान, महाभारतात धृतराष्ट्र होता. तसा हा धृतराष्ट्र नाहीये. हा महाराष्ट्र आहे, अशा वाटेला जाऊ नका. यातून कोणाचं भलं होणार नाही. इथे अनेकांना यायचं असतं पण येता येत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. दाऊदच्या घरात घुसून मारा. हिंमत दाखवा, असं आव्हान त्यांनी भाजपला दिलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, आम्ही थांबणार नाही”
मोठी बातमी! शिवसेनेचा आणखी एक बडा नेता ईडीच्या रडारवर, कोट्यवधींची मालमत्ता जप्त
मोठी बातमी! पुतिन यांचा रशियन सैन्याला मोठा आदेश
…म्हणून महाविकास आघाडीच्या आमदाराला भर विधानसभेत रडू कोसळलं!
“यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?”
Comments are closed.