Top News महाराष्ट्र मुंबई

ईडी हे त्यांच्या हातचं बाहुलं झालं आहे- छगन भुजबळ

मुंबई | मी जास्त बोलायला लागलो तर मलाही नोटीस पाठवली होती. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवारसाहेबांना अमंलबजावणी संचालनालयानं नोटीस बजावली होती. आता शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक यांचंही तसंच झालं आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

ED ची कारवाई ही ऑपरेशन लोटसचा भाग असू शकते, असा आरोप देखील छगन भुजबळ यांनी केला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

लोकशाहीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ही दडपशाहीच आहे. ED हे त्यांच्या हातचं बाहुलं, झालं आहे, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

आता जनतेलाही माहित झालंय की भाजपविरोधात कुणी बोललं तर त्यांना त्रास देण्यासाठी EDचा वापर होत आहे, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

शुद्र राजकारण करणं योग्य नसतं पण…- शरद पवार

प्रताप सरनाईकांवरील ईडीने केलेल्या कारवाईवर शरद पवार म्हणाले…

सुसाईड नोट लिहून बेपत्ता असलेले गौतम पाषाणकर अखेर सापडले!

“…तर केंद्र सरकार महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करेल”

ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या