बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला ईडीची नोटीस

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अटक करण्यात आली होती. नारायण राणे यांना अटक करताना राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये संभाषण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अनिल परब यांच्या अटकेची मागणी केली जात होती. त्यानंतर आता अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्याची माहिती समोर येत आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यांना मंगळवारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसतंय.

सचिन वाझे यांने लिहिलेल्या पत्रात मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटदार, मुंबईचे बार रेस्टॉरंट मालक यांच्याकडून लाखो रूपये वसूल करण्याचा दबाव माझ्यावर केला होता, असा त्या पत्रात वाझेंनी म्हटलं होतं. अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्यावरती देखील सचिन वाझेंनी आरोप केले आहेत. त्यामुळे अनिल परब यांच्यावरही ईडीची कारवाई होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

दरम्यान, अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल हे मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. तर अनिल देशमुख, एकनाथ खडसे आणि छगन भुजबळ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यात आता अनिल परब यांचाही समावेश झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

एकाच दिवसात तीन पदकं! थाळीफेक स्पर्धेत विनोद कुमारला कांस्यपदक

निशादची ऐतिहासिक कामगिरी; उंंच उडीत पटकावलं सिल्वर मेडल

अमेरिकेची चिंता वाढली; लष्करी साठ्यावर आता तालिबानचा कब्जा

“भाजप मनसे युती होणं अशक्य, भाजपला मनसेची काय गरज?”

अखेर ‘त्या’ शेतकऱ्याचा मृत्यू; देशभरात संतापाची लाट

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More