नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून देशात अनेक बड्या नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय सुडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली आहे.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये ईडीने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना समन्स बजावले आहेत. दोन्ही नेत्यांना 8 जून रोजी चौकशीला बोलावण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेते मनू सिंघवी यांनी दिली.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे परदेश दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी 8 जूनपर्यंत देशात परतल्यास चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे. दोन्हीही नेत्यांना ईडीसमोर हजर न राहण्याचा पर्याय असला तरी पुन्हा नोटीस बजावण्यात येऊ शकते. मनी लाँड्रिंग किंवा मनी एक्सचेंजचा कोणताही पुरावा नसताना नोटीस देण्यात आली, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये 55 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. न्यायालयात याचिका दाखल करून त्यांनी काँग्रेस नेत्यांवर आरोप केले होते. नोटीशीवरून प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी प्रत्यु्त्तर दिलं आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना नोटीस पाठवली आहे. मात्र, आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही, छाती ठोकून लढणार, असं रणदीप सुरजेवाले म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
राज्यसभेवरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य; ‘या’ काँग्रेस नेत्याने दिला राजीनामा
“दिल्लीत हुजऱ्या करणाऱ्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवून देऊ”
‘प्रसंगी रक्त सांडवू पण…’; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गंभीर इशारा
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांना धमकी
नारायण राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; पुन्हा नोटीस जारी
Comments are closed.