Top News महाराष्ट्र मुंबई

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’ची नोटीस 

मुंबई |  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस आली आहे. 29 डिसेंबरला त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून काहीजणांची चौकशी सुरू आहे.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती आहे. कलम 67 अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. मात्र अद्याप संजय राऊतांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ‘ईडी’ची नोटीस आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंनाही ‘ईडी’ची नोटीस आली असून यावर  ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नसल्याचं संजय राऊत म्हणाले होते.

दरम्यान, भाजवर आपल्या सामनाच्या अग्रलेखातून किंवा कोणत्या ना कोणत्या कारणावरून टीका करणाऱ्या राऊतांच्याच पत्नीला नोटीस आल्यामुळे राऊत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘गो कोरोना गो’ नंतर रामदास आठवलेंनी तयार केलं नवं स्लोगन!

“राज्य सरकारने संभाजी भिडेंना अटक करावी?”

अॅमेझॉननंतर मनसेचा मोर्चा पश्चिम रेल्वेकडे; पत्रकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी

‘…की अजितदादा आमच्याकडे आलेच म्हणून समजा’; केंद्रीय मंत्र्याने केला मोठा गौप्यस्फोट

“बोरूबहाद्दर राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या