Shilpa Shetty | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा उद्योगपती राज कुंद्रा हा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. अभिनेत्रीच्या घरावर आणि कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला असल्याची माहिती समोर येत आहे. शिल्पा शेट्टीच्या सांताक्रूझ येथे असलेल्या घरी अधिकाऱ्यांनी सकाळी 6 वाजता धाड टाकली. यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. (Shilpa Shetty )
काही दिवसांपूर्वी पॉर्नोग्राफी केस प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. याचप्रकरणी ईडीचं हे धाडसत्र सुरू असल्याची माहिती आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आता शिल्पा आणि राज यांच घर तसेच ऑफीसची झडती घेतली जात आहे.
शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड
राज कुंद्रा याला जून 2021 मध्ये मोबाइल अॅपच्या माध्यमातून अश्लील मजकूर तयार करणे आणि प्रसारित करणे या संदर्भात अटक करण्यात आली होती. कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता. दोन महीने शिल्पाचा नवरा हा तुरुंगात होता. त्याला नंतर जामीन देखील मिळाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्राने सर्व आरोप फेटाळले होते. (Shilpa Shetty )
मालवणी पोलिस स्टेशनमध्ये या रॅकेटसंदर्भात एका मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर 2021 मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. चित्रपट आणि ओटीटीवर काम मिळवून देण्याच्या नावाखाली काही लोक तरूणींना अश्लील चित्रपटात काम करण्याची जबरदस्ती करत असल्याचा आरोप यात करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी मालाड वेस्टमधील एका बंगल्यावर छापा टाकत बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीसह 11 जणांना अटक केली होती.
राज कुंद्राच्या अडचणी वाढणार?
पोलिसांनी बंगल्याची तपासणी केली असता, या अश्लील मजकूर निर्मिती मागे राज कुंद्राचा हात असल्याचे समोर आले होते. आता पुन्हा एकदा राज कुंद्रा हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वीच ईडीने शिल्पा शेट्टीचा जुहू फ्लॅट, राज कुंद्रा यांच्या नावे नोंदणीकृत बंगला, इक्विटी शेअर्स आणि 97.79 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या घरावर आणि काही कार्यालयावर ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. (Shilpa Shetty )
News Title – ED raid at Shilpa Shetty house
महत्त्वाच्या बातम्या-
लाडक्या बहीणींनो डिसेंबरचा हप्ता ‘या’ दिवशी येणार?, मोठी माहिती समोर
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात रक्त गोठवणारी थंडी पडणार?
महायुतीच्या मंत्रीमंडळात ‘या’ महिला आमदारांची लागणार वर्णी?
मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला? शिंदे व पवार गटाला कोणती पदे मिळणार; पाहा यादी
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, PF चे पैसे काढणं होणार सोप्पं