बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ!

नागपूर | राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय आणि ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अनिल देशमुख प्रकरणात सर्वात मोठी छापेमारी मोहिम राबवली आहे. अशातच आता अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचं दिसत आहे.

अनिल देशमुख यांच्या नागपुरातील मालमत्तेवर आज इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकला आहे. नागपुरातील जीपीओ चौक येथील निवास स्थानावर इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी सुरू आहे. महिनाभरात अनिल देशमुखांच्या घरी ही दुसरी धाड आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

काही दिवसांपूर्वी मनी लॅड्रिंग प्रकरणात ईडीनं अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर छापे सुद्धा टाकले होते. अनिल देशमुख्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता या प्रकरणात आणकी काय घडेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘…हे त्यांना रिअलाईज झालं असेल’; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार असं माझ्या कानावर आलंय- उद्धव ठाकरे

मनोज पाटीलनं केलेल्या गंभीर आरोपानंतर अभिनेता साहिल खानला अटक!

‘माझे भावी सहकारी…’; भाजपसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

पंतप्रधान मोदींमुळे रांगेतील शेवटच्या व्यक्तीचं कल्याण झालं- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More