बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप नेत्यांविरोधात याचिका दाखल करणाऱ्या सतीश उकेंच्या घरी ईडीची धाड

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fanavis) व आणखी काही भाजप नेत्यांविरोधात याचिका दाखल करणाऱ्या वकिलांच्या घरावर ईडीने (ED) छापेमारी केली आहे. अॅड. सतीश उके (Satish Uke) यांच्या नागपूर येथील घरी ईडीच्या पथकाने छापेमारी केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विरोधातील केसमध्ये सतीश उके काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील होते. सतीश उके यापूर्वीपासूनच जमिन गैरव्यवहार प्रकरणी नागपूर पोलिसांच्या रडारवर होते. मात्र, ईडीच्या छापेमारीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

2014च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हे लपवल्याच्या विरोधात उके यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर उके यांनी नितीन गडकरी यांच्यासह अनेक भाजप (BJP) नेत्यांविरोधात देखील याचिका दाखल केली होती.

दरम्यान, 2018 झाली सतीश उके यांना जमिन गैरव्यवहार प्रकरणात अटक झाली होती. सतीश उके यांच्यावरील कारवाईनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उके यांच्या घरी ईडीने केलेल्या छापेमारीवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

झेलेन्स्कींना सतावतेय ‘ही’ भीती, अधिकाऱ्यांना दिले काहीही न खाण्या पिण्याचे आदेश

“एकनाथ शिंदे हुशार व्यक्ती, त्यांनाच मुख्यमंत्री करा”

आधार, पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर आजच करा, अन्यथा होईल मोठं नुकसान

“संजय राऊतांनी कायमचं मौन धारण केलं तर शिवसेनेचं भलं होईल”

झेलेन्सकी यांचा रशियाला गंभीर इशारा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More