Top News राजकारण

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पुन्हा धाडले समन्स

मुंबई | खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पुन्हा समन्स बजावलेत. या नवीन समन्सप्रमाणे 5 जानेवारीला वर्षा राऊत यांना ईडीच्या कार्यालयात हजेर व्हावं लागणार आहे.

यापूर्वी देखील संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता पुन्हा नोटीस बजावण्यात आली असून पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणारे.

यापूर्वी बजावलेल्या समन्सनुसार 29 डिसेंबर रोजी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र, राऊत यांनी ईडीकडे थोडा वेळ मागितला होता.

वर्षा राऊत यांची ही विनंती ईडीने स्वीकारली. त्यानुसार पुन्हा नव्याने समन्स पाठवत 5 जानेवारीला ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिलेत.

थोडक्यात बातम्या-

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे; उर्मिला मातोंडकरांचा कंगणाला अप्रत्यक्ष टोला

शाब्बास! अजिंक्य रहाणेने केली डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी

भारत-ब्रिटन विमान प्रवासावरील बंदीत वाढ होणार; उड्डाणमंत्र्यांचे संकेत

हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा; भाजप आमदाराची टीका

10 वर्षांपासून स्वतःला खोलीत बंद ठेवलं; उच्चशिक्षित 3 भावंडांची कहाणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या