“शिवसेनेला त्रास देण्यासाठी ईडीच्या धाडी सुरु आहेत”; संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार सुरु झाली आहे. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत अनेक मुद्द्यांवर गौप्यस्फोट करणार आहेत. विशेष म्हणजे राज्यात सुरु असणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर संजय राऊत बोलणार आहेत.
शिवसेना भवनात पत्रकार परिषद सुरु असून तपास यंत्रणांमध्ये चाललेलं गौडबंगाल, पंतप्रधान मोदींना लिहिलेलं पत्र, ईडीमधला कथित भ्रष्टाचार तसंच भाजप नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
शिवसेनेला त्रास देण्यासाठी ईडीच्या धाडी सुरु आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आता संजय राऊतांच्या खुलास्यामुळे काय उघड होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, ईडीचे अधिकारी कुणाला धमकावतात, कुणाला खंडणी मागतात, त्यासंदर्भातील माहिती माझ्याकडे आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार मी आज उघड करणार, असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या –
“महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही”
‘एसटी संपावर लवकर निर्णय द्या, अन्यथा…’; सदाभाऊ खोत आक्रमक
“अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही, मोठेपणा दाखवायचं बंद करा”
दिशा सालियन प्रकरणी नितेश राणेंच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!
“नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही, दाऊदचा दबाव आहे का?”
Comments are closed.