बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब! ईडीने अनिल देशमुख यांची तब्बल 350 कोटींची मालमत्ता केली जप्त

मुंबई | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून समन्स बजावूनही त्यांनी चौकशीला हजर न राहता चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याच प्रकरणात ईडीने काल अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या लेटरमुळे महाराष्ट्रातील राजकारणात चांगलाच धुमाकूळ माजला असल्याचं चित्र पाहायला मिळालं. तसेच 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप असलेल्या गृहमंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. सक्तवसुली संचालनालयाने जप्त केलेल्या 04 कोटी 20 लाख रुपयांच्या अनिल देशमुख यांच्या मालमत्तेची आजची बाजार भावाची किंमत ही तब्बल 350 कोटी रुपयांहूनही अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.

अनिल देशमुख यांच्या मुलाची भागीदारी असलेल्या प्रीमिअर पोर्ट लिंक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे रायगड जिल्ह्यात 08 एकर 30 गुंठे जमीन  02 कोटी 67 लाख रुपयांना विकत घेतली. उरण पोर्ट व पळस्पे फाटा दरम्यान असलेली ही जमीन नवीमुंबई विमानतळापासून अगदी जवळच आहे. त्यामुळे आता सध्या या जमिनीचा बाजारभाव 1 कोटी रुपये प्रति गुंठा एवढा आहे.  

08 एकर 30 गुंठे म्हणजेच जवळपास 350 गुंठे असलेली ही जमीन आजच्या भावाप्रमाणे 350 कोटी रुपयांची असल्याची माहिती उघड झाली आहे. मुंबईतील काही बार मालकांनी आपण 04 कोटी 70 लाख रुपये सचिन वाझे या पोलिस अधिकाऱ्याला दिल्याचं म्हटलं आहे. त्यानुसारच ईडीने अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली असून त्या मालमत्तेची आजची बाजारातील किंमत ही 350 कोटी रुपयांहूनही अधिक आहे. 

 

 

थोडक्यात बातम्या –

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More