Top News राजकारण

ईडीने नारायण राणे यांच्या संपत्तीची चौकशी करावी; शिवसेना खासदाराची मागणी

मुंबई | शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधलाय. विनायक राऊत यांच्या विधानाने नारायण राणे अडणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

ईडीने नारायण राणे यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी केलीये. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

“नारायण राणे यांच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी. त्याचप्रमाणे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही भाजपच्या शंभर नेत्यांची नावं ईडीला चौकशीसाठी देऊ शकतो,” असा दावाही विनायक राऊत यांनी केलाय.

“भाजप ही सत्तेसाठी हपापलीये. म्हणूनच भाजप नेते सतत पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधतायत,” अशी टीकाही त्यांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या-

विहंग सरनाईक ईडीच्या चौकशीला गैरहजर; कारवाई होण्याची शक्यता

“पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची गरज पडणार नाही”

‘या’ कारणामुळे न्यूझीलंडमधून पाकिस्तानचा संपूर्ण संघ होऊ शकतो हद्दपार!

उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले…

पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली; आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या