मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्र्या जॅकलिन आणि नोराची ईडीकडून(ED) चौकशी झाली आहे. बाॅलिवूडमधील हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. त्यातच आता आणखी एका अभिनेत्रीला ईडीकडून समन्स पाठवण्यात आलं आहे.
रकुल प्रीत सिंगचं(Rakul Preet Singh) नाव टाॅलिवूड(Tollywood) ड्रग्ज मनी लाॅंडरिंग प्रकरणात समोर आलं आहे. नुकतेच यासंबंधी ईडीकडून तिला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं आहे.
तिला आता ड्रग्ज प्रकरणातील चौकशीसाठी 19 डिसेंबरला ईडीच्या कार्यलयात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळं रकुलची ईडीकडून चौकशी होण्याची ही दुसरी वेळ असणार आहे.
यापूर्वी रकुलची ईडीकडून चौकशी झाली होती. सप्टेंबर महिन्यात ती ईडीसमोर हजर राहीली होती. त्यातच आता तिची पुन्हा चौकशी होणार असल्यानं ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, रकुलनं आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट केले. तिचे बाॅलिवूडमधील चित्रपटही यशस्वी ठरले आहेत. त्यामुळं तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
महत्वाच्या बातम्या-