बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ खडसेंनंतर पत्नी मंदाकिनी खडसेंना ईडीचं समन्स!

मुंबई | भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी राज्याचे माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांना देखील ईडीने समन्स बजावलं होतं. त्यानंतर त्यांची ईडीच्या कार्यालयात तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर काल रात्री 8 वाजता एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. त्यांनंतर आता पुन्हा त्यांची डोकेदुखी वाढली आहे.

एकनाथ खडसेंनंतर आता त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना देखील ईडीनं समन्स बजावलं होतं. 7 जुलै रोजी मंदाकिनी यांना हजर राहण्याचे आदेश होते. मात्र, त्यांनी निवेदन देऊन 14 दिवसांची वेळ मागितली होती, अशी माहिती आता समोर येत आहे. मात्र ईडीने मंदाकिनी यांच्या निवेदनावर अद्याप कोणतंही उत्तर दिलेलं नाही.

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मंदाकिनी खडसे यांचा देखील समावेश असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. त्यानंतर त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता आहे, असं मत अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केलं होतं.

दरम्यान, भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. या प्रकरणाची जी उपलब्ध कागदपत्रं आहेत, त्यानुसार प्रथमदर्शी खडसे हे यात पूर्णतः दोषी असल्याचं असीम सरोदे यांनी म्हटलं होतं. काल झालेल्या ईडीच्या चौकशीत ईडीने एकनाथ खडसे यांना आणखी काही कागदपत्र जमा करण्यास सांगितलं आहे. त्यानंतर त्यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

‘माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळा’; नव्या मंत्र्यांना नरेंद्र मोदींनी केल्या ‘या’ सूचना

‘…तर मी पुन्हा येईन’; भर कार्यक्रमात संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

रस्त्यावर ‘वर्दी उतरव’ म्हणत तरूणाची पोलिसांसमोर मुजोरी; अटकेनंतर ढसाढसा रडला

एकनाथ खडसेंची तब्बल 9 तास ईडी चौकशी; चौकशीला खडसेंचा सकारात्मक प्रतिसाद

…म्हणून त्या 12 मंत्र्यांचा राजीनामा घेतला- नरेंद्र मोदी

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More