बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ईडीचा अविनाश भोसलेंना दणका, केली ‘ही’ मोठी कारवाई!

पुणे | पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मालकीच्या अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेड (ABIL) या कंपनीच्या चार कोटी मालकीच्या जमिनीवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ज्या जमिनीची जप्ती करण्यात आली आहे. त्या जमिनीवर अविनाश भोसले यांच्या कंपनीचं कॉर्पोरेट कार्यालय आहे.

अविनाश भोसले हे प्रसिद्ध व्यावसायिक आणि महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय व्यक्तीसोबत जवळीक असलेले व्यक्ती आहेत. अविनाश भोसले हे महाराष्ट्रातील राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.

ईडीकडून फेब्रुवारी महिन्यामध्ये पुण्यातील कार्यालयात आणि निवासस्थानी छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारी दरम्यान भोसलेंचा मुलगा अमित याचीसुद्धा चौकशी करण्यात आली होती.

दरम्यान, ईडीकडून अविनाश भोसले यांच्या पुणे, मुंबई आणि दुबई मधील संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांनी ईडीच्या कारवाईविरूद्ध न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती समजत आहे. मात्र न्यायालयाचा निर्णय अद्याप बाकी असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या

“आम्ही दगडूशेठ समोर गाऱ्हाणं मांडलं म्हणून पुण्यातील निर्बंध शिथील झाले”

आदित्य ठाकरेंचा रावसाहेब दानवेंना टोला, म्हणाले ‘आधीचे रेल्वे मंत्री…’

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची तारीख जाहीर; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज

धडाकेबाज फलंदाज स्टीवन स्मिथ घाबरतो जगातील ‘या’ चार गोलंदाजांना; ‘या’ भारतीयाचा आहे समावेश

सोन्याच्या दरात मागील चार महिन्यातील सर्वात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More