सर्वसामान्यांना झटका! खाद्य तेलाच्या दरात झाली मोठी वाढ

Edible Oil price Increase

Edible Oil | आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. सरकारने कच्च्या तेलावरील आयात शुल्क 10 टक्क्यांनी वाढवलं आहे. मात्र, या घोषणेनंतर राज्यभरात खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं. खाद्य तेलाच्या दरात प्रति किलो 20 ते 25 रुपयांची वाढ झाल्याचं समोर आलं. यामुळे ऐन सणा-सुदीच्या काळात सामान्य जनतेला मोठा झटका बसला आहे. (Edible Oil)

सरकारने कालच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला. सरकारने आयात करण्यात येणाऱ्या कच्या तेलावर आयात शुल्क हे 10 टक्क्यांनी वाढवलं. मात्र, ही घोषणा होताच दुसरीकडे खाद्य तेलाच्या किंमती वाढल्या. यामुळे सामान्य जनतेचे बजेटही आता कोलमडणार आहे.

कोणत्या तेलाचे दर वाढले?

सोयाबीन – पहिले दर 110 तर आताचे दर 130 रुपये आहेत.
शेंगदाना – पहिले दर 175 तर आताचे दर 185 रुपये आहेत.
सूर्यफुल – पहिले दर 115 तर आताचे दर 130 रुपये आहेत.

सोयाबीन दरवाढीसाठी तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती.सरकारने ही मागणी मान्य करत याबाबत  मोठी घोषणा केली. केंद्र सरकारकडून कच्चे सोयाबीन,पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात 20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली. (Edible Oil)

कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर लगेच दरवाढ

तसेच रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 13.75 टक्क्यांवरुन वरून 35.75 टक्के करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून सोयाबीन दरवाढीसाठी तेलावरील आयात शुल्कात 20 ते 30 टक्के वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली होती. याचबरोबर सरकारने कांदा, बासमती तांदळावरील निर्यातमूल्य देखील हटवले आहे. मात्र, या निर्णयानंतर लगेच खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं. (Edible Oil)

News Title :  Edible Oil price Increase

महत्वाच्या बातम्या-

महादेवाच्या कृपेने आज ‘या’ 5 राशींना लाभच लाभ मिळणार!

अखेर अनन्याकडून आदित्य राॅय कपूरसोबतच्या ब्रेकअपबद्दल खुलासा!

ईद-ए-मिलाद-उन-नबी 2024 कधी साजरा होणार; जाणून घ्या योग्य तारीख

Aadhar Card वापरकर्त्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर!

अरबाजची गर्लफ्रेंड निक्कीवर भडकली; म्हणाली ‘मी तुला कधीच..’

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .