नवी दिल्ली | दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल केलं आहे. भाज्या, कडधान्य, गॅस सिंलेडर यांच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलं होतं. आता खाद्यतेल्याच्या (Ediaable oil) किमती प्रति किलो 15 रूपयांनी कमी झाल्याने गृहिनींना थो़डासा दिलासा मिळाला आहे. यामुळे स्वयंपाकघरातील खर्च कमी झाला आहे.
उत्पादकांनी खाद्यतेल,पामतेल, सोयाबीन तेलाच्या किमतीत घट केली आहे. दिल्लीतील मदर डेअरी या कंपनीने खाद्यतेलाच्या किमतीत प्रतिकिलो 15 रूपयांची घट केली आहे. धारा या कंपनीनेही खाद्यतेलाच्या किमतीत घट केली आहे. 235 रुपयाचं असणार धारा रिफाईन्ड सनफ्लॉअर ऑईल आता 220 रूपयांना मिळणार आहे तसेच धारा रिफाईन्ड सोयाबीन तेल 208 ऐवजी 193 रूपयाला मिळणार आहे.
आतंरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती घसरल्यानं त्यांचा परिणाम भारतीय बाजारात होत आहे. यामुळे खाद्यतेलाच्या किंमती घसरल्याची माहिती मदर डेअरी आणि इडिंयन व्हेजिटेहल ऑइल प्रोड्युसर असोशियन अध्यक्षांनी दिली आहे. पण प्रिमियम खाद्यतेलाच्या किमती कमी होण्यास वेळ लागेल, अशीही माहिती दिली.
दिवसेंदिवस वाढत्या महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आणि गृहिणींसाठी ही एक दिलासादायक बातमी असेल.
थोडक्यात बातम्या
“राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, शरद पवारांकडे कोणती उंची आहे त्यांनी सांगावं”
‘…तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये’; कृषीमंत्री दादा भुसे यांचं आवाहन
राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ, वाचा आकडेवारी
काय सांगता! आता व्हॉट्सअॅपवरून कर्जही काढता येणार, वाचा सविस्तर
“पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्याने पक्षात सर्वकाही अलबेल आहे असं भाजपने समजू नये”
Comments are closed.